देशात सायबर फसवणुकीवर लगाम घालण्यासाठी सरकारनं आतापर्यंतचा सर्वात मोठा डिजिटल कारवाईचा बडाएक्शन घेतला आहे. बनावट डॉक्युमेंट्सवर नोंदवलेले 1.75 कोटी SIM कार्ड्स बंद करण्यात आले असून, पहिल्यांदाच 22 लाख WhatsApp अकाऊंट्सना ब्लॉक करण्यात आलं आहे. हे कसे शक्य झाले आणि कोण आले सरकारच्या रडारवर – जाणून घ्या सविस्तर.
फसव्या डॉक्युमेंट्सवर घेतलेले 78 लाख SIM कार्ड्स बंद
सरकारच्या माहितीनुसार, 78 लाख SIM कार्ड्स बनावट ओळखपत्रांच्या आधारे नोंदवले गेले होते. हे SIM ‘अस्त्र टूल’ नावाच्या AI व फेस रिकग्निशनवर आधारित तंत्रज्ञानाद्वारे ओळखले गेले. या टूलचा प्रारंभिक वापर हरियाणाच्या मेवात जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात आला होता, जिथे 16.69 लाख नंबरपैकी तब्बल 5 लाख फसवे आढळले.
97.5 लाख SIM कार्ड्स – नागरिकांच्या अनभिज्ञतेत नोंदवले
दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ पोर्टलद्वारे 97.5 लाख SIM कार्ड्स बंद करण्यात आलेत, जे लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या ID वर नोंदवले गेले होते. अनेक लोकांनी तक्रार केली होती की त्यांच्या नावावर सिम कार्ड चालू आहेत पण त्यांनी ते घेतलेलेच नाहीत. यानंतर सर्व संशयित सिम बंद करण्यात आले.
WhatsApp वर मोठी कारवाई – 22 लाख अकाऊंट्स ब्लॉक
सरकारने केवळ सिम कार्ड्सवरच नव्हे, तर WhatsApp अकाऊंट्सवरही कडक पावले उचलली आहेत. 22 लाख WhatsApp अकाऊंट्स हे सायबर फसवणुकीसाठी वापरले जात असल्याच्या संशयावरून प्रतिबंधित करण्यात आले आहेत.
हे अकाऊंट्स फसवणूक लिंक, फेक व्हिडीओ कॉल्स, मिस्ड कॉल्स वापरून लोकांना गंडावत होते. ही मोठी कारवाई ऑनलाइन फ्रॉड्सवर लगाम घालण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.
सामान्य नागरिकांसाठी दिलासा, गुन्हेगारांवर कारवाई
या तात्काळ आणि मोठ्या कृतीमुळे फसवे डॉक्युमेंट वापरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे, तर सामान्य लोकांना आता त्यांच्या नावावर चालणाऱ्या सिम कार्ड्सची माहिती मिळवणं ‘संचार साथी’ पोर्टलमुळे सहज शक्य आहे.
हे फक्त डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठीच नव्हे, तर नागरिकांच्या डिजिटल ओळखीच्या सुरक्षेसाठीही एक मोठं पाऊल आहे.
जागरूक राहा, सुरक्षित राहा
सरकारचं हे पाऊल टेक्नोलॉजीचा प्रभावी वापर असून सायबर क्राइमविरोधातील सशक्त संदेश देखील आहे. तुम्ही अजूनपर्यंत ‘संचार साथी’ पोर्टलवर तुमच्या नावावर किती सिम आहेत ते तपासलं नसेल, तर आजच एकदा जरूर तपासा.
लक्षात ठेवा – जागरूकता हीच खरी सुरक्षा आहे.