OPPO ने आपली नवी Reno14 स्मार्टफोन सिरीज भारतात अधिकृतपणे लाँच केली असून Reno14 आणि Reno14 Pro हे दोन्ही फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पॉवरफुल AI फीचर्स, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त लॉन्च ऑफर्ससह ही सिरीज ई-कॉमर्स आणि ऑफलाइन स्टोअर्सवर खरेदीसाठी तयार आहे.
Reno14 Pro 5G: फ्लॅगशिप AI स्मार्टफोन
Reno14 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8450 चिपसेट असून OPPO Reno सिरीजमध्ये प्रथमच 50W वायरलेस चार्जिंगचा समावेश करण्यात आला आहे. यात 6,200mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे जी फक्त 50 मिनिटांत पूर्ण चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे.
या फोनला IP66, IP68 आणि IP69 प्रमाणपत्रे मिळाली आहेत, म्हणजेच हा फोन धूळ, पाणी आणि प्रेशर स्प्रेमुळे खराब होत नाही. कॅमेरासाठी 50MP मुख्य सेन्सर, 3.5x टेलीफोटो झूम आणि 120x AI झूम सपोर्ट आहे. त्यासोबत Underwater Mode, AI Best Face, AI Eraser 2.0, आणि AI Editor यांसारखे स्मार्ट AI टूल्सही मिळतात.
- उपलब्ध रंग: पर्ल व्हाइट, टायटॅनियम ग्रे
Reno14 5G: स्टाईल आणि परफॉर्मन्सचं कॉम्बो
Reno14 5G मध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर आहे. फोनचे डिझाईन Reno14 Pro प्रमाणेच असून Corning Gorilla Glass 7i आणि अल्युमिनियम फ्रेम देण्यात आले आहे. यात 6,000mAh बॅटरी आहे जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग नसली तरी कॅमेरा आणि AI फीचर्स Pro वर्जनसारखेच आहेत.
- उपलब्ध रंग: पर्ल व्हाइट, फॉरेस्ट ग्रीन
किंमत आणि वेरिएंट्स
Reno14 Pro 5G
- ₹49,999 – 12GB RAM + 256GB
- ₹54,999 – 12GB RAM + 512GB
Reno14 5G
- ₹37,999 – 8GB RAM + 128GB
- ₹39,999 – 12GB RAM + 256GB
- ₹42,999 – 12GB RAM + 512GB
लॉन्च ऑफर्स: EMI, कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस
OPPO कडून मिळत आहेत अनेक धमाकेदार लॉन्च ऑफर्स:
- ₹5,000 पर्यंत त्वरित कॅशबॅक (निवडक क्रेडिट कार्ड्सवर EMI सह)
- 0 डाउन पेमेंट EMI प्लॅन – 10 महिन्यांपर्यंत
- ₹5,000 पर्यंत एक्सचेंज बोनस, पार्टनर प्लॅटफॉर्म्सवर
अॅडिशनल बेनिफिट्स
फोनसोबत मिळत आहेत खास सबस्क्रिप्शन आणि प्रोटेक्शन फायदे:
- 3 महिने Google One (2TB) + Gemini Advanced सबस्क्रिप्शन फ्री
- 6 महिने OTT अॅप्स बंडल, Jio ₹1,199 प्लॅनसह
- 180 दिवसांची वाढीव वॉरंटी आणि स्क्रीन प्रोटेक्शन
आता खरेदी करायला हव की नहीं!
OPPO Reno14 सिरीज अत्याधुनिक AI तंत्रज्ञान, ताकदवान कॅमेरा, आणि दमदार बॅटरीसह भारतीय ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय घेऊन आली आहे. जर तुम्हाला वायरलेस चार्जिंग आणि सुपर झूम हवे असेल तर Pro वर्जन उत्तम पर्याय आहे, तर स्टायलिश आणि बजेट अनुकूल फोन हवा असेल तर Reno14 5G हे योग्य ठरेल.